मराठी विशेषण टॉपिक टेस्ट 1

विशेषण Quiz

विशेषण Quiz - 25 प्रश्न

1. 'विशेषण' म्हणजे काय?
क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द
नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द
अव्यय शब्द
सर्वनामाचा प्रकार
2. विशेषणाचे मुख्य प्रकार किती आहेत?
दोन
तीन
चार
पाच
3. 'कडू कारले' मधील 'कडू' कोणते विशेषण?
गुणविशेषण
संख्याविशेषण
सार्वनामिक विशेषण
नामसाधित विशेषण
4. 'दहा मुली' मधील विशेषण कोणते?
मुली
दहा
सुंदर
त्या
5. 'तो मुलगा हुशार आहे' मधील 'तो' कोणते विशेषण?
गुणविशेषण
सार्वनामिक विशेषण
क्रियाविशेषण
धातुसाधित
6. 'पाचवा मजला' मधील 'पाचवा' कोणते विशेषण?
गणनावाचक
क्रमवाचक
आवृत्तीवाचक
अनिश्चित
7. 'काही मुले' मधील 'काही' कोणते विशेषण?
अनिश्चित संख्याविशेषण
निश्चित संख्याविशेषण
गुणविशेषण
क्रमवाचक
8. 'सातारी पेढे' मधील 'सातारी' कोणते विशेषण?
नामसाधित
धातुसाधित
अव्ययसाधित
गुणविशेषण
9. 'वाहती नदी' मधील 'वाहती' कोणते विशेषण?
नामसाधित
धातुसाधित
गुणविशेषण
सार्वनामिक
10. 'वरचा मजला' मधील 'वरचा' कोणते विशेषण?
नामसाधित
अव्ययसाधित
धातुसाधित
गुणविशेषण
11. 'आमची शाळा' मधील 'आमची' कोणते विशेषण?
सार्वनामिक विशेषण
गुणविशेषण
संख्याविशेषण
नामसाधित
12. 'शूर मुलगा' मधील 'शूर' कोणते विशेषण?
गुणविशेषण
संख्याविशेषण
धातुसाधित
अव्ययसाधित
13. 'पाचही पांडव' मधील 'पाचही' कोणते विशेषण?
साकल्यवाचक
क्रमवाचक
गणनावाचक
आवृत्तीवाचक
14. 'एक-एक मुलगा' कोणते विशेषण?
पृथक्त्ववाचक
साकल्यवाचक
क्रमवाचक
गुणविशेषण
15. 'पुणेरी पगडी' मधील 'पुणेरी' कोणते विशेषण?
नामसाधित
धातुसाधित
गुणविशेषण
अव्ययसाधित
16. 'लबाड लांडगा' मधील 'लबाड' कोणते विशेषण?
गुणविशेषण
संख्याविशेषण
सार्वनामिक
धातुसाधित
17. 'हसरे बाळ' मधील 'हसरे' कोणते विशेषण?
नामसाधित
धातुसाधित
गुणविशेषण
अव्ययसाधित
18. 'खालची पायरी' मधील 'खालची' कोणते विशेषण?
गुणविशेषण
अव्ययसाधित
धातुसाधित
नामसाधित
19. 'शंभर लोक' मधील 'शंभर' कोणते विशेषण?
गणनावाचक
क्रमवाचक
आवृत्तीवाचक
पृथक्त्ववाचक
20. 'थोडे पाणी' मधील 'थोडे' कोणते विशेषण?
अनिश्चित संख्याविशेषण
गुणविशेषण
निश्चित संख्याविशेषण
क्रमवाचक
21. 'काळा घोडा' मधील 'काळा' कोणते विशेषण?
गुणविशेषण
संख्याविशेषण
धातुसाधित
सार्वनामिक
22. 'बोलकी बाहुली' मधील 'बोलकी' कोणते विशेषण?
नामसाधित
धातुसाधित
गुणविशेषण
अव्ययसाधित
23. 'ती शाळा' मधील 'ती' कोणते विशेषण?
सार्वनामिक विशेषण
गुणविशेषण
धातुसाधित
नामसाधित
24. 'अर्धा तास' मधील 'अर्धा' कोणते विशेषण?
अपूर्णांकवाचक
पूर्णांकवाचक
क्रमवाचक
गुणविशेषण
25. 'सुंदर मुलगी' मधील 'सुंदर' कोणते विशेषण?
गुणविशेषण
सार्वनामिक
धातुसाधित
संख्याविशेषण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025