सामान्य ज्ञान टेस्ट महत्वाचे 25 प्रश्न

मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच | Marathi GK Quiz

मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच | Marathi GK Quiz

स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. Police Bharti, MPSC, Talathi आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी ही Quiz उपयुक्त आहे.

या Quiz चे फायदे:
  • स्पर्धा परीक्षांची तयारी सुधारते
  • वेळ व्यवस्थापन सुधारते
  • Online Mock Test अनुभव मिळतो
  • महत्त्वाचे प्रश्नांचा सराव होतो

Online Quiz

1) खालील पैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते?
✔ योग्य उत्तर: महात्मा गांधी
स्पष्टीकरण:24 जानेवारी 1950 रोजी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेच्या तीन (इंग्रजीतील छापील प्रत, इंग्रजीतील हस्तलिखित प्रत आणि हिंदीतील हस्तलिखित प्रत) प्रतीवर सह्या केल्या. स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधान सभेतील 299 सदस्यांमध्ये एकूण 15 महिलांचा समावेश होता. संविधान सभेची एकूण 11 सत्रे झाली.महात्मा गांधी व मोहम्मद अली जीना हे महत्त्वाचे नेते संविधान सभेचे सदस्य नव्हते..
2) भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?
✔ योग्य उत्तर: साम्राज्यवादी
स्पष्टीकरण:साम्राज्यवाद म्हणजे जेव्हा एखादा देश आर्थिक किंवा राजकीय फायद्यासाठी इतर प्रदेशांमध्ये आपली सक्ती वाढवतो. अल्फोन्सो डी अल्बुकर्क हे भारतातील दुसरे पोर्तुगीज गव्हर्नर होते ज्यांनी 'साम्राज्यवादाचे धोरण' मांडले. साम्राज्यवादाच्या वसाहतींवर विपरीत परिणाम झाला, यामुळे परकीय राजवटीत मूळ संस्कृती आणि उद्योग नष्ट झाले..
3) ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला?
✔ योग्य उत्तर: आईन्स्टाईन
स्पष्टीकरण:सापेक्षतेचा विशेष सिद्धांत जून 30, इ.स. 1905 रोजी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी मांडला. सूत्र E = mc² या सिध्दांताच्या आधारे अणूबाँब व अणूऊर्जा तयार केली..
4) इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला?
✔ योग्य उत्तर: जे.जे. थॉमसन
स्पष्टीकरण:प्रोटॉनचा शोध - गोल्डस्टिव्ह न्यूट्रॉन - चॅडविक इलेक्ट्रॉन - जे.जे. थॉमसन .
5) शून्याचा शोध कोणी लावला?
✔ योग्य उत्तर: आर्यभट्ट
स्पष्टीकरण:थॉमस एडिसन - विद्युत दिव्याचा शोध न्यूटन - गतिविषयक नियम, गुरुत्वीय बलाचे नियम, प्रिझमचा शोध, दुर्बिणीचा शोध, कॅलक्युलसचा जनक आर्यभट्ट हे महान गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते..
6) वैद्यकशास्त्रचे जनक कोण?
✔ योग्य उत्तर: हिपोक्रेटस
स्पष्टीकरण:प्लेटो - हे तत्त्वज्ञानाचे जनक असून त्यांनी 'द अकॅडेमी' चालू केली. अपोलो यांना संगीत, नृत्य व धनुर्विद्येची देवता मानले जाते. .
7)टॉक्सिकॉलॉजी हे कशाशी संबंधित शास्र आहे ?
✔ योग्य उत्तर: विष
स्पष्टीकरण:चामडे व त्वचा यासाठी डरमॅटॉलॉजी (Dermatology) शास्र आहे. अनुवंशिकता यासाठी इनहेरिटन्स (Inheritance) म्हणतात. विषाविषयी अभ्यास म्हणजे टॉक्सिकॉलॉजी होय.
8)हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला ?
✔ योग्य उत्तर: सिकोस्र्की
स्पष्टीकरण:एडिसन या शास्त्रज्ञाने लाइटचा (विजेचा बल्ब) शोध लावला. जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावला. जॉन वॉकर यांनी फ्रिक्शन लाइटचा शोध लावला. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. .
9) झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते?
✔ योग्य उत्तर: वूलार
स्पष्टीकरण:.
10)आल्फ्रे ड नोबेल यांनी कशाचा शोध लावला ?
✔ योग्य उत्तर:डायनामाईट
स्पष्टीकरण:आल्फ्रेड नोबेल यांच्या भावाचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू झाला, म्हणून सुरक्षित स्फोटके शोधण्यावर त्यांनी लक्ष दिले व डायनामाईटचा शोध लावला. डायनामाईटचा उपयोग विहीर खोदताना, खाणकाम करताना स्फोट घडवून आणण्यासाठी केला जातो. आल्फ्रेड नोबेल यांच्या नावे नोबेल पुरस्कार दिला जातो. नोबेल पुररस्कार 6 क्षेत्रातील जिवंत व्यक्तींना दिला जातो .
11)रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला ?
✔ योग्य उत्तर: कोल्ट
स्पष्टीकरण: हितवरिव्हॉल्व्हरचा (लहान बंदूक) शोध सॅम्युल कॉल्ट याने लावला100 ते 200 मीटरवरील निशान्यासाठीची 5 ते 10 गोला बंदुकीत असतात..
12)अंतराळ प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण ?
✔ योग्य उत्तर: राकेश शर्मा
स्पष्टीकरण: 2 एप्रिल 1984 रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन संत कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोय्झ टी-11 यांनातून प्रवास. राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून हो होते. "अंतराळातून भारत कसा दिसतो?" या प्रश्नाला त्यांनी जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा" असे उत्तर दिले. सन्मान - अशोक चक्र.
13) भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो?
✔ योग्य उत्तर: विज्ञान
स्पष्टीकरण: हितक्षेत्र चित्रपट: दादासाहेब फाळके पुरस्कार कृषी: बोरलॉग पुरस्कार हीड साहित्य: ज्ञानपीठ पुरस्कार विज्ञान :भटनागर पुरस्कार.
14)अँटिरेबीजच्या शोधाचे जनक कोण आहेत ?
✔ योग्य उत्तर: लुई पाश्चर
स्पष्टीकरण: हलुई पाश्चर यांनी अँटिरेबीजचा शोध लावला एडवर्ड जेन्नर यांनी देवी या रोगावर लस शोधून काढली. लुई पाश्चर यांनी अँथ्रेक्स, रेबीज, कॉलेरा या रोगांवरील लसी शोधल्या. त्यांना सूक्ष्मजीवशास्राचे (Microbiology) जनक असे म्हणतात. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला.
15) 1802 मध्ये इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार कोणी केला?
✔ योग्य उत्तर: दुसरा बाजीराव
स्पष्टीकरण: .
16)वेगाचे ऽ। एकक कोणते ?
✔ योग्य उत्तर: मीटर / सेकंद
स्पष्टीकरण: विशिष्ट काळात वस्तूने कापलेले अंतर म्हणजे वेग होय. विस्थापन वेग = वेळ वेग हे एक सदिश राशीचे उदाहरण आहे. (अंतर ही अदिश राशी आहे.).
17) त्वरणाचे SI एकक कोणते?
✔ योग्य उत्तर: मीटर / प्रति सेकंद वर्ग
स्पष्टीकरण: हितवादत्वरणाचे एकक = m/s² त्वरण म्हणजे वेग बदलाचा दर होय. त्वरण धनात्मक किंवा ऋणात्मक असू शकते. वेगातील बदल त्वरण = वेळ ही सदिश राशी आहे..
18) हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?
✔ योग्य उत्तर: बॅरोमीटर
स्पष्टीकरण: वातावरणीय दाब मोजणी = मिलीबारमध्ये (atm) वातावरणीय दाब = 76 सेमी mmHg = 1013 मिलीबार 10400 पास्कल = 10 मीटर पाण्याची उंची (समुद्रसपाटीला) बॅरोमीटर यामध्ये पाऱ्याचा उपयोग केला जातो.
19) हवेचा दाब कोणत्या परिमाणात मोजतात?
✔ योग्य उत्तर: मिलीबार
स्पष्टीकरण: वातावरणीय दाब मोजणी = मिलीबारमध्ये (atm) 1 वातावरणीय दाब = 76 से.मी. mm Hg= 1013 मिलीबार.
20) ज्यूल हे...... चे एकक आहे?
✔ योग्य उत्तर:ऊर्जा
स्पष्टीकरण:1 ज्यूल = 10' अर्ग एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच 'ऊर्जा' होय. CGS पद्धतीत ऊर्जेचे एकक अर्ग (Erg) आहे.
21) उष्णतेचे ऽ। मापन पद्धतीतील एकक कोणते?
✔ योग्य उत्तर: ज्यूल
स्पष्टीकरण: हितवउष्णतेचे SI एकक = ज्यूल उष्णतेचे MKS पद्धत एकक = किलोकॅलरी उष्णतेचे CGS पद्धत एकक = कॅलरी 1 किलोकॅलरी = 1000 कॅलरी 1 कॅलरी = 4.184 किंवा 4.2 ज्यूल.
22)वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो ?
✔ योग्य उत्तर: नॉट्स
स्पष्टीकरण: हितवाऱ्याचा वेग मोजण्याचे यंत्र पवनवेगमापक. (अॅनिमोमीटर)1 नॉट = 1.85 किमी प्रति तास वेग. वाऱ्याचा वेग मोजण्याचे एकक - नॉट्स.
23) आवाजाची किती डेसिबल ही अधिकतम पातळी मनुष्य सहन करू शकतो ??
✔ योग्य उत्तर: 85
स्पष्टीकरण: आवाज किंवा ध्वनीचा तीव्रता डेसिबल (db) मध्ये मोजली जाते. 85 डेसिबलपेक्षा अधिकचा आवाज दीर्घकाळ राहिल्यास व्यक्तीला अनेक समस्या उ‌द्भवतात. सततच्या आवाजाने बहिरेपणा, चिडचिड होणे, डोकेदुखी हृदयरोग अशा समस्या उ‌द्भवतात.
24) ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये......असतो.?
✔ योग्य उत्तर: खूप अधिक
स्पष्टीकरण: विरळ माध्यमातून घन माध्यमात जाताना ध्वनीचा वेग वाढतो. सर्वाधिक वेग ते उतरत्या क्रमाने सर्वात कमी
25) रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो ?
✔ योग्य उत्तर: रेडियो
स्पष्टीकरण: रडार यंत्रणेत रेडिओ लहरींचा उपयोग केला जातो. Radar Radio detection and Ranging. उपयोग विमाने, हेलिकॉप्टर्स, जहाजे यांचा हल्ला होण्याआधी पूर्वसूचना देणे.

स्पर्धा परीक्षा साठी महत्त्वाच्या अभ्यास टिप्स

  • दररोज मराठी टेस्ट वाला Mock Test सोडवा
  • जुन्या टेस्टचा अभ्यास करा
  • कमकुवत विषयांवर जास्त लक्ष द्या
  • वेळेचे योग्य नियोजन करा

FAQ

1) ही Quiz कोणासाठी उपयुक्त आहे?
Police Bharti, Talathi, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी.

2) रोज marathitestwala ची quiz सोडवावी?
किमान 25 ते 50 प्रश्नांचा सराव करावा.

3) Online Quiz मुळे फायदा होतो का?
होय, त्यामुळे वेग आणि अचूकता वाढते.

© 2026 Marathi Test Wala - All Rights Reserved
⬅️ मागील पोस्ट पाहा

टिप्पण्या