सामान्य ज्ञान टेस्ट

मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच | Marathi GK Quiz

मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच | Marathi GK Quiz

स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. Police Bharti, MPSC, Talathi आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी ही Quiz उपयुक्त आहे.

या Quiz चे फायदे:
  • स्पर्धा परीक्षांची तयारी सुधारते
  • वेळ व्यवस्थापन सुधारते
  • Online Mock Test अनुभव मिळतो
  • महत्त्वाचे प्रश्नांचा सराव होतो

Online Quiz

1) युनियन कार्बाईड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती??
✔ योग्य उत्तर: भोपाळ
स्पष्टीकरण:भोपाळ दुर्घटना - 3 डिसेंबर 1984. > ठिकाण - युनियन कार्बाइड कंपनी > मिथाईल आयसोसाइनाइट च्या गळतीमुळे..
2) ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे?
✔ योग्य उत्तर: वातावरणातील बदल
स्पष्टीकरण:पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड व अशाच अन्य काही घातक वायूचे प्रमाणवाढले की हरीत गृह परिणाम होतो. > हरीतगृह परिणांमुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते..
3) कार्बन डेटिंग ही.......निश्चित करण्याची शास्त्रीय पध्दत आहे??
✔ योग्य उत्तर: वस्तूंचे वय
स्पष्टीकरण:कार्बन डेंटिंगसाठी C-14 (कार्बन 14) आणि कार्बन- 1 मूलद्रव्य वापरतात. > कार्बन - 14 चा अर्धायुष्यकाळ हा 5760 वर्षे आहे..
4) भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात?
✔ योग्य उत्तर: पंतप्रधान
स्पष्टीकरण:पंतप्रधान केंद्र शासनाचे प्रमुख प्रवक्ता म्हणून कार्य करतात. > कॅबिनेट समित्यांचे अध्यक्ष सहसा पंतप्रधान असतात मात्र इतर मंत्री सुद्धा त्याचे अध्यक्ष असू शकतात, एखाद्या समितीमध्ये पंतप्रधान सदस्य असतील तर ते समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात. > कॅबिनेट समितीची निर्मिती पंतप्रधानामार्फत काळ व परिस्थितीच्या गरजेनुसार केली जाते. .
5) मंत्रिमंडळ हे यांना जबाबदार असते.?
✔ योग्य उत्तर: लोकसभा
स्पष्टीकरण:कलम 75 (3) नुसार मंत्रिमंडळ सामूहिकरीत्या लोकसभेला जबाबदार असेल. संसदीय शासन व्यवस्थेचे हे एक महत्त्वाचे मूलभूत तत्त्व आहे. > मंत्रिमंडळाची सामुहिक जबाबदारी म्हणजे सर्व मंत्री त्यांनी केलेल्या किंवा न केलेल्या कृत्यांसाठी संयुक्तरीत्या लोकसभेला जबाबदार असतात. > सर्व मंत्री एक गट म्हणून कार्य करतात, मंत्रिमंडळ एकत्रित बुडते किंवा एकत्रित तरंगते..
6) भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी खालीलपैकी कोण असतो ??
✔ योग्य उत्तर: महान्यायवादी
स्पष्टीकरण:केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये भारताच्या महान्यायवादीचा सुद्धा समावेश होतो. घटनेच्या कलम 76 मध्ये भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद करण्यात आली आहे. ते भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कार्य करतात. भारताच्या महान्यायवादी यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते. कार्यकाल - राष्ट्रपतींच्या मर्जीन .
7)भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते ?
✔ योग्य उत्तर: राज्यसभा
स्पष्टीकरण:घटनेच्या कलम 79 अन्वये भारताच्या संघराज्यासाठी एक संसद असेल आणि ती राष्ट्रपती व लोकसभा आणि राज्यसभा ही दोन सभागृहे मिळून बनलेली असेल. > राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते भारतीय संघराज्यातील घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते. राज्यसभा > कलम 81 - लोकसभा > कलम 80 राज्यसभा
8)लोकसभेमध्ये राष्ट्रपती किती सदस्यांना नामनिर्देशित करू शकतात ?
✔ योग्य उत्तर: 12
स्पष्टीकरण:घटनेच्या कलम 331 अंतर्गत राष्ट्रपतींना अँग्लो इंडियन समाजातील महत्तम 2 सदस्य (या समाजाला लोकसभेत पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेले नाही अशी राष्ट्रपतींची खात्री झाल्यास) लोकसभेवर नामनिर्देशित करता येतात. > प्रश्नांमध्ये अँग्लो इंडियन सदस्यांना नामनिर्देशित असा संदर्भनसल्यामुळे प्रश्न रद्द झाला असावा. > 104 वी घटनादुरुस्ती 2019 नुसार लोकसभेत 2 अँग्लो इंडियन सदस्य नामनिर्देशित करण्याची तरतूद रद्द करण्यात आलेली आहे..
9) महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती ?
✔ योग्य उत्तर: 48
स्पष्टीकरण:लोकसभेच्या रचनेची तरतूद कलम 81 मध्ये देण्यात आलेली आहे. > लोकसभेचे महत्तम सदस्य संख्या 552 इतकी ठरविण्यात आली आहे. मात्र, सध्या लोकसभेची सदस्य संख्या 545 आहे. > 545 पैकी महाराष्ट्राचे लोकसभेत 48 प्रतिनिधी आहेत, यापैकी.
10)धनविधेयक कोणत्या सभागृहा मध्ये प्रस्तुत केले जाते ?
✔ योग्य उत्तर:फक्त लोकसभेत
स्पष्टीकरण:धनविधेयक कलम - 110 > धनविधेयक बाबत सर्व अधिकार लोकसभेला असतात. > धनविधेयक राज्यसभेला मान्य करावेच लागते. > धनविधेयक राष्ट्रपतींच्या संमतीने मांडले जाते. > त्यामुळे राष्ट्रपती धनविधेयकाला मान्यता देतातच.
11)राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही ?
✔ योग्य उत्तर: विधानपरिषद निर्वाचित सदस्य
स्पष्टीकरण: > राष्ट्रपतींच्या निवडणूकीत मतदान करणारे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा यांचे निर्वाचित सदस्य. .
12)लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष असतो. ?
✔ योग्य उत्तर: लोकसभेचे सभापती
स्पष्टीकरण:संयुक्त बैठकीबाबत महत्त्वाचे > अध्यक्ष लोकसभेचे सभापती > कलम - 108 > बोलावतो - राष्ट्रपती > आतापर्यंत 3 वेळा अशा बैठका झाल्या आहेत. > स्रोत - ऑस्ट्रेलिया .
13) भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो?
✔ योग्य उत्तर: विज्ञान
स्पष्टीकरण: हितक्षेत्र चित्रपट: दादासाहेब फाळके पुरस्कार कृषी: बोरलॉग पुरस्कार हीड साहित्य: ज्ञानपीठ पुरस्कार विज्ञान :भटनागर पुरस्कार.
14) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन.... येथे होते. ?
✔ योग्य उत्तर: नागपूर
स्पष्टीकरण: सर्वसाधारणपणे विधिमंडळाची वर्षभरात तीन अधिवेशने होतात. > त्यापैकी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते..
15) महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा कालावधी किती आहे ?
✔ योग्य उत्तर: 6 वर्ष
स्पष्टीकरण: विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून जातात. > विधान परिषद हे राज्य विधान मंडळाचे स्थायी सभागृह असून ते विसर्जित केले जात नाही. > मात्र त्याचे 1/3 सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. > निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी दर दोन वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात किंवा नवीन सदस्य नामनिर्देशित केले जातात..
16)वेगाचे SI एकक कोणते ?
✔ योग्य उत्तर: मीटर / सेकंद
स्पष्टीकरण: विशिष्ट काळात वस्तूने कापलेले अंतर म्हणजे वेग होय. विस्थापन वेग = वेळ वेग हे एक सदिश राशीचे उदाहरण आहे. (अंतर ही अदिश राशी आहे.).
17) पंचायती राज प्रणाली कोणत्या तत्त्वांवर आधारित आहे?
✔ योग्य उत्तर: विकेंद्रीकरण
स्पष्टीकरण: विकेंद्रीकरणपंचायतराज प्रणाली विकेंद्रीकरण तत्त्वावर आधारित आहे. > विकेंद्रीकरण म्हणजे राज्य व केंद्र सरकारकडे असलेल्या सत्तेचे स्थानिक पातळीवर केलेले हस्तांतरण होय. > अनेक परवानग्या, कामे, अधिकार, निर्णय आता ग्रामपंचायत स्तरावर घेतले जातात. > केंद्रीकरण म्हणजे स्थानिक अधिकार वरच्या पातळीवर घेणे होय.
18) पाणी पंचायत' या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले ?
✔ योग्य उत्तर: विलासराव साळुंखे
स्पष्टीकरण:विलासराव साळुंखे यांनी पाण्याचे समान वाटप व्हावे म्हणून 30 वर्षे संघर्ष केला. > त्यांनी केलेला प्रयोग नायगाव पॅटर्न म्हणून ओळखतात
19) प्रत्यक्ष असणारे किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे, त्यांना व्याकरणात.... असे म्हणतात.
✔ योग्य उत्तर: नाम
स्पष्टीकरण:नाम - वाक्यात येणारे शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना नामे म्हणतात. उदा. नदी, हरी, सौंदर्य > विशेषण - जे शब्द नावाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना विशेषण असे म्हणतात. उदा. गोड > सर्वनामे - जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनामे असे म्हणतात. उदा. ते .
20) खालीलपैकी योग्य वाक्य ओळखा?
✔ योग्य उत्तर:विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते
स्पष्टीकरण:सामान्य नाम हे जातीवाचक असते. > विशेष नाम है व्यक्तिवाचक असते. > पदार्थाच्या गुणाबरोबर स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या नामांना भाववाचकनाम असे म्हणतात..
21) कोणता शब्द प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही??
✔ योग्य उत्तर: चूप
स्पष्टीकरण: चूप' हा अव्यय मौनदर्शक या प्रकारात येतो. यामध्ये चूप, चूपचाप, गप, गुपचुप इ. अव्ययाचा वापर होतो.
22)पुढील वाक्याच्या आरंभी कोणते केवलप्रयोगी अव्यय वापरावे ? ....! काय अवस्था झाली तुझी !?
✔ योग्य उत्तर: अरेरे
स्पष्टीकरण: अरेरे' हे अव्यय शोकदर्शक या प्रकारात येते.
23) आवाजाची किती डेसिबल ही अधिकतम पातळी मनुष्य सहन करू शकतो ??
✔ योग्य उत्तर: 85
स्पष्टीकरण: आवाज किंवा ध्वनीचा तीव्रता डेसिबल (db) मध्ये मोजली जाते. 85 डेसिबलपेक्षा अधिकचा आवाज दीर्घकाळ राहिल्यास व्यक्तीला अनेक समस्या उ‌द्भवतात. सततच्या आवाजाने बहिरेपणा, चिडचिड होणे, डोकेदुखी हृदयरोग अशा समस्या उ‌द्भवतात.
24) शाब्बास ! आरोही चांगले यश मिळविलेस ! शाब्बास ! या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा?
✔ योग्य उत्तर: प्रशंसादर्शक
स्पष्टीकरण: प्रशंसादर्शक या प्रकारात छान, वाहवा, भले, शाब्बास, यंव, ठीक, फक्कड, खाशी इ.
25) अरेरे! अजिंक्य रहाणे आऊट झाला! अरेरे या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.?
✔ योग्य उत्तर: शोकदर्शक
स्पष्टीकरण: अरेरे, शिवशिव हे शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहेत.

स्पर्धा परीक्षा साठी महत्त्वाच्या अभ्यास टिप्स

  • दररोज मराठी टेस्ट वाला Mock Test सोडवा
  • जुन्या टेस्टचा अभ्यास करा
  • कमकुवत विषयांवर जास्त लक्ष द्या
  • वेळेचे योग्य नियोजन करा

FAQ

1) ही Quiz कोणासाठी उपयुक्त आहे?
Police Bharti, Talathi, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी.

2) रोज marathitestwala ची quiz सोडवावी?
किमान 25 ते 50 प्रश्नांचा सराव करावा.

3) Online Quiz मुळे फायदा होतो का?
होय, त्यामुळे वेग आणि अचूकता वाढते.

⬅️ मागील पोस्ट पाहा
© 2026 Marathi Test Wala - All Rights Reserved

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी व्याकरण अव्यय टेस्ट

चालू घडामोडी टेस्ट 31 मार्च 2026